जाती, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन केवळ मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान सांगणारा धर्मविचार म. फुले यांनी सांगितला होता आणि त्याच विचारांच्या पायावर ‘सत्यशोधक समाज’ उभा होता!

लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, असे अनेक समाजसुधारक हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी-परंपरेबद्दल व पुरोहितशाहीच्या वर्चस्वाबद्दल, अमानुष जातीप्रथेबद्दल, स्त्रियांच्या दयनीय स्थितीविषयी त्यांच्या हलाखीविषयी लिहीत होते आणि यासारख्या सर्व प्रश्नांची उलटसुलट चर्चा सुरू होती, पण ती चर्चा मध्यमवर्गापुरतीच मर्यादित होती. महात्मा फुले याला अपवाद होते.......