‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ ही आपल्या राज्यघटनेची देण आहे, त्यावर आपण पुढची कमाई करू शकतो
भारतीय राज्यघटना कोणत्याही एका धर्माला ओळख देत नाही, तिच्यात कोणत्याही एका धर्माचं नाव नाही आणि ती कोणत्याही एका देवाला ओळख देत नाही. ती मी सतत लावून धरतो, तुम्हीही लावून धरा. ‘वैज्ञानिक दृष्टीकोना’साठी चांगले नागरिक तयार व्हावे लागतात, आणि चांगले नागरिक तयार होण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये नागरिकशास्त्र २० मार्कांचं नाही, तर १०० मार्कांचं असावं लागेल.......