‘डिजिटल युगा’तले कौटुंबिक सहजीवन ‘सही’ जीवन होईल?
कामांच्या जागा व स्वरूपे यातील संक्रमणानुसार कौटुंबिक सहजीवनाचे स्वरूप बदलले; पण कुटुंबाचा पाया मात्र एका घरात एकत्र राहण्यात नसून जगण्यासाठी, जीवनाच्या अर्थपूर्णतेसाठी एका ठिकाणी एकत्र काम करण्यात, निर्मिती करण्यात आहे, ही गोष्ट इतिहासक्रमात निरपवादपणे टिकून राहिलेली आहे. ‘को-लिव्हिंग’ हा सहजीवनाचा पाया नसून ‘को-वर्किंग’ किंवा ‘को-क्रिएटिंग’ हा पाया आहे. ‘को-वर्किंग’ या साध्याचे ‘को-लिव्हिंग’ हे साधन आहे.......