उदारमतवाद हा लोकशाही मूल्यांच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेला मानसिक घटक असून, तो मनाच्या खुलेपणाशी खूप जवळून जोडला गेला आहे

आपल्या समूहामध्ये राहणे, आपल्या समूहाला पसंती देणे आणि इतर समूहांपासून दूर राहणे होय. असे करणे हे सामान्य मानवी वर्तन असते, सोपे असते. त्याचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक फायदेदेखील असतात. परंतु, हे वर्तन हुकूमशाही पद्धतीच्या राजकीय व्यवस्थेला अनुरूप असे आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये याउलट वर्तन अपेक्षित असते. आपल्याहून जे वेगळे लोक आहेत, त्यांना समजून घेणे आणि सर्वसमावेशक असणे, हे लोकशाहीशी सुसंगत वर्तन आहे.......