या जमातीतील ९८ टक्के लोकांकडे रेशनकार्ड नाही, ७२ टक्के लोक भूमिहीन आहेत आणि ९८ टक्के लोकांना बँक माहीत नाही!
तमाम भारतीयांसाठी ‘३१ ऑगस्ट’ हा दिवस तसा कॅलेंडरवरील एक सामान्य दिवस. परंतु हा दिवस विमुक्त जमातींचा ‘स्वातंत्र्य दिन’. होय, ३१ ऑगस्ट १९५२ हा दिवस स्वतंत्र भारतातील तथाकथित गुन्हेगार जमातींचा स्वातंत्र्य दिन. विमुक्त म्हणजे ‘विशेष मुक्त’. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी, जे लोक पारतंत्र्यात जगत होते, त्यांना ३१ ऑगस्ट १९५२ रोजी स्वातंत्र्य देण्यात आले.......