वृत्तपत्रांनी त्यांचा समाजभिमुख चेहरा जपला, तरच त्यांची प्रतिष्ठा कायम राहील, आणि लोकशाही मूल्यांची जपणूकही होत राहील…

छापील पावित्र्य आजही कायम आहे. मात्र, वृत्तपत्रे स्वत:च आशयापासून भरकटत चालली आहेत. व्यावसायिक गणिते सांभाळताना वृत्तपत्रांची कसरत होत आहे. लोकशाही टिकवण्याचे शिवधनुष्य वृत्तपत्रांनी पेलावे, ही अपेक्षा जरा जास्तच वाटते. अर्थात, ती वृत्तपत्रांची जबाबदारी आहे, परंतु आज गटातटातील समूह अत्यंत आक्रमक झाले आहेत. वृत्तपत्राचे संपूर्ण व्यापारीकरण झाल्याने त्यांच्याकडून निव्वळ आदर्शाची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल.......