आजच्या अतिशय थिजलेल्या आणि सर्वग्रासी संकटाच्या काळात सुधीरसारख्या विचारवंताचं अचानक जाणं चटका लावणारं आहे...
सुधीरचं जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे तो नेमकेपणानं वैचारिक फरक स्पष्ट करायचा. समाजवाद्यांमधील विविध विचारधारा, आंबेडकर विचारांच्या आधारे काम करणारे विविध गट किंवा डांगे-रणदिवे वाद व सीपीआय-सीपीएम् यांच्या भूमिकांमधील फरक, असे बारकावे तो सांगायचा, वाचायला उद्युक्त करायचा. डोळे झाकून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका, एवढंच म्हणून तो थांबायचा नाही, तर कोणाचीही व्यक्तीपूजा त्याला अमान्यच होती.......