मातीवर जीव लावणाऱ्या जिवांची माती उघड्या डोळ्यांनी पाहवत नव्हती...
जिला शोधायला आलो ती सापडली नाही; पण जिव्हारी लागणारं सत्य बाहेर आलं. बहुतेक चौकशीतल्या तरुण मुली, शेतकरी परिवारांतून आल्या होत्या. शेतीदारिद्रयाला कंटाळून, होरपळून, बापाचे ओझे हलके करावे म्हणून त्यांनी हा वेदनामय मार्ग स्वीकारला होता. मातीवर जीव लावणाऱ्या जिवांची झालेली ही माती उघड्या डोळ्यांनी पाहवत नव्हती. वेदनांचे असंख्य डंख जिवाला होत होते. या वस्तुस्थितीनं माझे मन पोखरून निघाले होते.......