‘लुकिंग फॉर मिस सरगम’ : संगीतक्षेत्रातील शोषणाच्या कथा
‘लुकिंग फॉर मिस सरगम’ या कथासंग्रहातील सातही कथा संगीतात करिअर करणाऱ्याने किंवा त्यात गम्य असणाऱ्या प्रत्येकाने वाचल्या पाहिजेत. आपल्याला वाटत असतं की, संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्यानं खूप रियाज करून आपल्या सुरांना लखलखीत, धारदार बनवलं की, यश त्याच्या/तिच्या मागेमागे येईल. गाण्यातला रियाज करून जाणकारांमध्ये मान्यता मिळाल्यानंतरही या क्षेत्रात किती शोषण असू शकतं, याचं चित्रण या पुस्तकात लेखिकेनं केलं आहे.......