ऐकून घेणारा कान आपण मुलांना पुरवतो, तेव्हा त्यांना आपोआपच आपल्याशी बोलावंसं वाटू लागतं!
मुलांचे मित्र होण्यासाठी, मुलं लहान असल्यापासून त्यांचं बोलणं नीट ऐकून घेण्याची सवय ठेवायला हवी. आपण ऐकतो ते प्रतिक्रिया देण्यासाठीच, समजून घेण्यासाठी नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे उत्तर, सल्ला किंवा उपदेश तयार असतो. मुलं बोलताना कित्येकदा आपण काय प्रत्युत्तर द्यायचं याचाच विचार करत असतो. खरं तर याची गरज नसते. मुलं काय बोलतायत ते समजून घेण्याची, त्यांच्या भावनांना शब्दरूप देण्याची गरज असते.......