एक वटवृक्ष उन्मळला आहे; एक युगंधर गेला आहे
‘सामान्यांचा असामान्य कैवारी’ ही जनमानसातली अत्र्यांची प्रतिमा आहे. आपला निर्भय आणि समर्थ कैवारी गेला या भावनेने मराठी जनतेत दु:खाचा हलकल्लोळ उडावा हे स्वाभाविक आहे. आघात मोठाच आहे. एक फुलझाड कोमेजलेले नाही, एक वटवृक्ष उन्मळला आहे. एक खांब कलथलेला आहे, एक पिरॅमिड उदध्वस्त झालेला आहे. एक युगंधर निघून गेला आहे. काही वर्षे तरी मराठीचिये नगरी भग्न विजयनगरची कळा दिसत राहील.......