गांधी आणि आंबेडकर (पूर्वार्ध)
डॉ. बाबासाहेबांनी गांधींना कधी महात्मा म्हटले नाही. ते महात्मा होते असे त्यांचे मतही नव्हते. हे त्यांनी कधी लपवूनही ठेवले नाही. गांधींवर अत्यंत जहाल टीका वर्षानुवर्षे त्यांनी केली. हा वारसा आंबेडकरी राजकीय चळवळीला लाभलेला आहे. हा वारसा जोवर ही चळवळ बाबासाहेबांच्या नावे जतन करू इच्छिते, तिचा राजकीय वापर करू इच्छिते, तोवर समन्वय शक्य होणार नाही, हे आपण खेदपूर्वक, पण मोकळेपणाने स्वीकारायला हवे.......