‘गुटेनबर्गच्या सावल्या’ : स्त्रियांच्या प्रकाशन व्यवसायातील योगदानाची नोंद
उर्वशी बुटालिया, रितू मेनन, चिकी सरकार, मिली ऐश्वर्या, नीता गुप्ता कार्तिकी व्हीके, नाझिया खान यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. या सर्व स्त्रिया महिलांच्या अधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी सिद्धांतनाची मांडणी करणाऱ्या आहेत. पुरुषी वर्चस्व असलेल्या याही व्यवसायात या स्त्रिया आपला हस्तक्षेप नोंदवत आहेत.......