वंशवाद आणि जातीवाद यांनी ग्रासलेल्या राजकारणाला पर्याय असू शकतो का? अमेरिकन कृष्णवर्णीय लढा आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यांतील देवाणघेवाण मांडणारे पुस्तक
भारतात गेल्या काही वर्षांत मुस्लीम, दलित आणि डाव्या चळवळींवरील वाढलेले दडपण याला समांतर म्हणता येईल. स्त्रियांवरील अत्याचाराच्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत अमेरिका भारतीय समाजाइतकाच पाशवी आहे. व्यवस्थात्मक हिंसा रुजली की, त्याचे परिणाम समाजातील सर्वांत कमकुवत घटकांवर मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे भारत एक राष्ट्र म्हणून कोणते प्रारूप समोर ठेवेल, हा प्रश्न आज सतत विचारला गेला पाहिजे.......