अतिशय गांभीर्याने आणि पोटतिडकीने लिहिलेल्या वाचनीय दीर्घकथांचा संग्रह
शिंत्रे यांच्या कथारचना हे एक बांधकाम आहे. चुस्तपणे व एका निश्चित उद्देशाने होणारे. पण म्हणून ते कृत्रिम नाही. कथाबीजाचं स्फुरण हे प्रतिभेचं काम आहे, परंतु त्यानंतरची उभारणीवरचना अभ्यासातून आणि अभ्यासातून आणि संशोधनातून सिद्ध झालेली आहे. त्यामध्ये गुंतलेला माणूस लेखकाला महत्त्वाचा वाटतो. या माणसानं त्याच्या अंतिम कल्याणाकडे बघावं अशी तळमळ त्यामागे आहे. पर्यावरणाचा विचार हा लेखकाचा निदीध्यास आहे.......