सिंगा वेस्ता पाडवी नावाच्या एका नर्मदा विस्थापिताची कहाणी
सिंगा वेस्ता पाडवी. मूळ गाव डनेल. वय-८० वर्षे. सरदार सरोवर प्रकल्पात महाराष्ट्राच्या विस्थापित होणाऱ्या ३३ गावांपैकी अक्कलकुवा तालुक्यातील डनेल गावचे विस्थापित. सरदार सरोवर धरण पूर्ण झाले असले तरीही महाराष्ट्रात सिंगा पाडवींसारखी शेकडो, तर मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलनाचा लढा आजही नर्मदेच्या खोऱ्यात सुरूच आहे.......