बातम्यांपासून लांब राहण्याची डझनभर कारणे आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाची तीन सांगतो
सुमात्रामध्ये भूकंप, रशियामध्ये विमान दुर्घटना, हायडी क्लम सीलपासून वेगळी झाली, बँक ऑफ अमेरिकामध्ये भरघोस पगार, पाकिस्तानमध्ये हल्ला, मालेच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा, शॉट पुटमध्ये नवा जागतिक विक्रम... हे सर्व तुम्हाला माहीत असण्याची खरंच गरज आहे का? आपल्याकडे माहितीचा भक्कम साठा असतो, पण तरीही आपल्यात ज्ञान कमी असते. का? कारण दोन शतकांपूर्वी आपण एका विषारी ज्ञानाचा शोध लावला – ‘बातम्या’.......