‘नव-उदारमतवादी युगा’चा अंत होऊ घातलाय. आता पुढे काय?
टीव्हीवरील चर्चांमध्ये आणि संध्याकाळच्या भोजन प्रसंगी आपण आपल्या आवडीची सक्रियता निवडावी अशी आपली भावना असते. आपण ग्रेटा थुनबर्गला सलाम करतो; तिचे कौतुक करतो व तिला पाठिंबा देतो, परंतु पर्यावरणवाद्यांच्या रस्त्यावरील धरणं आंदोलनाबद्दल संताप व्यक्त करतो, किंवा आपण ‘वॉल स्ट्रीटचा ताबा घ्या’ म्हणणाऱ्या आंदोलनकर्त्यांचं कौतुक करतो; परंतु दावोसकडे निघालेल्या दबावगट सदस्यांचा तिरस्कार करतो.......