निरीश्वरवादी असणे ही एक वास्तववादी आकांक्षा आहे. आणि त्यात धैर्य आहे; संतुलित, नैतिक असे बौद्धिक समाधान आहे.
इंग्रजीतील प्रसिद्ध आणि बेस्टसेलर लेखक रिचर्ड डॉकिन्स यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ हे प्रचंड लोकप्रिय झालेलं आणि जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. मुग्धा कर्णिक यांनी केला असून मधुश्री पब्लिकेशन हे पुस्तक प्रकाशित करत आहे. १५ फेब्रुवारीपासून हे पु्स्तक उपलब्ध होईल. या पुस्तकाला रिचर्ड डॉकिन्स यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.......