ही कादंबरी स्त्रीवादीचं सोंग न घेता पात्रांच्या सामूहिक शहाणपणाने आणि सामूहिक हतबलतेमधून झालेल्या साक्षात्कारातून स्वत:चा मुक्तीवादी ‘मोक्ष’ शोधत राहते...
मेलोड्रॅमॅटिक सिनेमातील पात्रे जशी आपल्या ‘लार्जर दॅन लाइफ’ मनोविश्वाचा भाग होऊन जातात, अगदी तसेच या कादंबरीतील पात्रे आपल्या मनाला हलवून जातात. कुणाचेच चुकले नाही, पण प्रत्येक जण काहीतरी दुखलं-खुपलं म्हणून न्यायाची दाद मागत आहे : “मला आनंदी जीवन जगायचं आहे, मला माझ्या मायेचा-प्रेमाचा अनुशेष मिळू दे, मला माझे हरवलेले सौख्य मिळू दे... हे दयाघना!” .......