‘हिंद स्वराज’ची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही
गांधीविचारांचा अभ्यास करणाऱ्याला ‘हिंद स्वराज’ या पुस्तकाची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तो काही धर्मग्रंथ नाही, पण एखादी उत्कृष्ट साहित्यकृती जशी दर वाचनात वेगळी भासते, त्याचप्रमाणे हे लहानसे चिंतनात्मक पुस्तक दर वाचनात नवीन विचारांना चालना देते. गांधींनी मुळात हे विचार इंग्रजीत न लिहिता गुजरातीत का लिहिले असा मुद्दा मांडला गेला आहे. हे विचार त्यांना शांत राहू देईनात, असे गांधींनी सांगितले आहे.......