शेतीच्या प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केलेय, पण राज्यकर्ते तुष्टीकरणात मश्गूल आहेत...
कृषिक्षेत्राच्या समस्यांनी उग्र रूप धारण केलं असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य सरकारने नेहमीचेच तुष्टीकरणाचे धोरण अवलंबलेले आहे. मोफत वीज आणि वाढीव अनुदानाची खैरात शेतकऱ्यांवर केली जाते आहे आणि मंत्री कर्ज माफीच्या मागणीचा गोंधळ घालत आहेत. या लोकप्रिय घोषणा येणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी मतांवर डोळा ठेवून केल्या जात आहेत.......