सत्याग्रही समाजवादाचा जावडेकरांचा विचार आजही महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे!
सत्याग्रही समाजवादाचा जावडेकरांचा विचार आज महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरतो, तो त्यातील तत्त्ववैचारिक आशयामुळे. राष्ट्रवादी राजकारणासंबंधी भाष्य करतानाच या राजकारणाचा आशय ओलांडून मानवमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारे एक घवघवीत, देशी (आणि तरीही वैश्विक) तत्त्वज्ञान देण्याचा प्रयास जावडेकरांनी आपल्या आयुष्यात केला. त्यांचा हा प्रयास आधुनिक भारतीय राजकीय विचारांना दिलेले एक अतुलनीय योगदान आहे.......