दक्षिण आशियायी राष्ट्रांत प्रचंड मोठा भौगोलिक पसारा असूनही भारताने मात्र लोकशाही व्यवस्थेचा ढाचा टिकवून ठेवला आहे!
विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकानंतर दक्षिण आशियातील बहुतेक राष्ट्रे स्वतंत्र झाली. वसाहतवाद्यांना या देशांतल्या लोकशाही यंत्रणा टिकतील का, अशी रास्त शंका होती. पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये लोकशाही आणि हुकूमशाही यांचा लपंडाव चालू आहे. श्रीलंका आणि नेपाळ राजकीय अस्थिरतेतून गेले आहेत, जात आहेत. भूतानचे हळूहळू लोकशाहीकरण होते आहे. तर म्यानमार आणि मालदीव येथे संधी मिळेल तिथे लष्करशहा सत्ता बळकावत आहे.......