आम्हा पती-पत्नीला या महाभयानक रोगाची लागण होऊन आम्ही सुखरूपपणे त्यातून बाहेर पडलो…
माझा डिस्चार्जचा दिवस उजाडला. सुप्रिया एक दिवस उशिरा अॅडमिट झाल्यामुळे तिला एक दिवस उशीरा डिस्चार्ज मिळणार होता. माझे डिस्चार्ज पेपर्स रात्रीच सही करून तयार होते. मी मुख्य दरवाजाबाहेर पाऊल टाकले!! आहाहाss! तो सूर्यप्रकाश! निळे आकाश!! हो! हो!! मी जिवंत होतो! मी जिवंत आहे!! माझ्यासारखे आणखी काही भाग्यवान माझ्यासोबत मागून येत होते!! या सगळ्यांसोबत परमेश्वरही माझ्या मागे होता तर...! जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती!.......