जसं जुगारामध्ये जुगार चालवणाऱ्याचा नाही, तर तो खेळणाऱ्याचा संसार उदध्वस्त होतो; तशीच अवस्था आपल्या मतदारांची झाली आहे. त्यांच्याकडून हा खेळ खेळून घेतला जातोय...

मतदान केंद्राबाहेर मर्सिडिजने येणारा आणि पांगूळगाड्यावर येणारा एकाच रांगेत उभा राहतो. एवढंच नाही, तर त्या दोघांच्याही मताची किंमत माणूस म्हणून एक आहे, समान आहे. अन्यथा, आपल्या देशात ना भाषा एक आहे, ना प्रांत, ना मानवानेच निर्माण केलेला धर्म एक आहे; ना निसर्गाने दिलेला रंग एक आहे, ना हिमतीने कमावलेला मान-सन्मान, धन एक आहे. फक्त नि फक्त संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार एक आहे, तिथेच आम्ही फक्त एकमेकांच्या बरोबरीत आहोत.......