स्वत:च्या हक्कासाठी आता प्रत्येकीनं बोलतं होण्याची गरज आहे!
किती गृहीत धरतो आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या बायांना. आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको, मुलगी... नात्यांची लेबलं बदलली तरी गृहीत धरणं बदललेलं नाही. तिने सगळ्यांना सांभाळावं, समजून घ्यावं, नवऱ्याचं ऑफिस, मुलांची शाळा, घरातली कामं... सगळं तिच्यावर टाकून घरातले पुरुष निवांत होतात! आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं बाईवर टाकून बाहेरच्या जगात मोकळेपणानं वावरण्याची पुरुषांची ही सवय नवीन नाही.......