व्यवस्थाच मातृभाषेच्या अभ्यासाला दुय्यम स्थान देत असेल तर तो दोष भाषा शिकणाऱ्यांचा नाही, भाषा शिकवणाऱ्याचा आहे!
आपली बोली घेऊन जगणारे मानव समूह आजही अनेक पट्ट्यात अस्तित्वात आहेत. ते आपले संस्कार, आपली बोली, आपल्या रीतीभाती घेऊन आपले दैनंदिन व्यवहार करीत असतात. आपल्या बोलीचे संरक्षण करावे म्हणून त्यांनी जागतिक भाषा शिकूच नये, केवळ आपल्या बोलीभाषेतच आपली प्रगती करावी, ज्ञानाच्या भाषेकडे त्यांनी वळूच नये, असा विचार मांडणाऱ्यांचा हेतू पुन्हा नव्या वर्णवर्चस्ववादाच्या पलीकडे जात नाही.......