कौटुंबिक आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक विवाहितांना ‘आषाढ वैभव’ स्पष्ट उलगडलेले असते!
कालिदासाला ‘मेघदूत’ हे काव्य ज्या काळात सुचले असेल, तो काळ तेव्हाच्या आषाढी एकादशीचा होता. तत्कालीन सारे वारकरी पंढरपूरला निघून गेल्यावरचा होता. त्या वेळी कालिदासाने हे पाहिले असावे की, ‘विठ्ठल विठ्ठल’ हा गजर करीत कैक खेड्यातील अनेक वारकरी जेव्हा गावातून वारीसाठी बाहेर पडत, तेव्हा ते गेले की घरी उरायचे कोण? तर घरातील विवाहित तरुण मुलगा अथवा प्रौढमुलगा आणि त्यांच्या पत्नी!.......