प्रेमाताई पुरव : सामाजिक कार्य, महिलांचे शिक्षण, पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणार्या धडाडीच्या कार्यकर्त्या
अशिक्षित आणि परित्यक्ता महिला व मुले यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचे सबलीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांनी १९७५मध्ये महिलाकेंद्रित ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’ची स्थापना केली. प्रत्येक गरीब महिलेच्या चेहर्यावर हास्य आणि महिलांचे आर्थिक स्वावलंबन हे ध्येय त्यांनी उराशी बाळगले. ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’त सहभागी होणार्या प्रत्येकास प्रेमाताईंची महिला सबलीकरणाची तळमळ आणि सामाजिक बांधिलकी जाणवते.......