२०१४पर्यंत भारतात काहीच झालं नाही, असं मानणाऱ्या अंधभक्तांना आणि नंतर झालेल्या अनेक चांगल्या गोष्टींमध्ये फक्त दोष काढणाऱ्या मंडळींना हे पुस्तक बरंच काही शिकवून जाईल!

भारताच्या ७५ वर्षांच्या प्रगतीचा विस्तीर्ण पट मांडणे, हे एक शिवधनुष्यच आहे आणि ते लेखक धर्माधिकारी यांनी समर्थपणे पेललंय. सोपी ओघवती भाषा आणि रेखीव बांधणी; चित्रं, नकाशे, आलेख, संख्याशास्त्र याचा यथायोग्य वापर, या सर्व गोष्टींमुळे हे पुस्तक वेगळ्या उंचीवर जातं. शक्य असल्यास या पुस्तकाची ‘जनआवृत्ती’ काढावी. दुसरं म्हणजे भारतातल्या प्रमुख, निदान हिंदी आणि इंग्रजी, भाषांत हे पुस्तक उपलब्ध करावं.......