बाळ ठाकूर : एक सिद्धहस्त ‘रेषा’
सलग, लयदार आणि प्रचंड आत्मविश्वास असलेली बाळ ठाकूरांची कागदातूनच उमटून आलीय अशी वाटणारी स्वयंभू, ‘सिद्धहस्त रेषा’. पूर्ण चित्रच काय, नुसती रेषाही निरखत राहावी अशी. कुठल्या बिंदूवर ती सुरू होऊन इतके अनपेक्षित, विलोभनीय आळोखेपिळोखे देत ती कशीकशी संचार करते, ते दरवेळी थक्क होऊन पाहत राहावं. ठाकूरांनी त्यांच्या इलस्ट्रेशनमध्ये ‘ग्रे’चा वापर केल्याचे कधी पाहिले नाही. कायम काळीभोर लवलवती रेषा.......