‘अनऑर्थोडॉक्स’ : या मालिकेतल्या एस्टीइतकं नाही, पण थोडं ‘अनऑर्थोडॉक्स’ व्हायला काय हरकत आहे?
‘Unorthodox’ ही मालिका आहे न्यूयॉर्कमध्ये एका भागात राहणाऱ्या Hasidic Jew समाजाची, रूढी-परंपरांना घट्ट धरून ठेवणाऱ्या ज्यू धर्मीय कुटुंबात जन्माला आलेल्या ‘एस्टी’ची. फ्लॅशबॅक आणि वर्तमान यांचा सुंदर मेळ साधत मारिया श्रेडरचं अप्रतिम दिग्दर्शन असलेली ही मालिका आपल्याला दिङमुढ करते. खोलवर रुजलेल्या रूढी, परंपरा मनात प्रश्न निर्माण करतात. आणि ‘जगण्यासाठी’ आसुसलेल्या १९-२० वर्षांच्या एस्टीची धाडसी वृत्तीही अचंबित करते.......