पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरची माझ्या अल्पवयीन भारतीय नागरिकांची देशभक्ती
माझ्या या अल्पवयीन भारतीय नागरिकांना गर्दी जमा करता येते, मात्र विचार मांडता येत नाही. मग त्यांनी चांगले विचार मांडणाऱ्या गुरुजींना बोलावले, कार्यक्रमाकरिता पैसे नव्हते. कार्यक्रमाला स्टेज बनवण्याकरिता माझ्याच घरचा लाकडी तख्त (पलंग) नेला. घरच्याच फाटक्या सतरंज्या, चादरी बसायला टाकल्या. त्यांच्या प्रत्येक वृत्तीतून मला देशभक्ती दिसत होती.......