करोनाग्रस्तांचे आकडे लपवले जात आहेत, स्थिती जास्त खराब झालीय.
जेव्हा सगळ्या युक्त्या संपतात, तेव्हा भात्यातून शेवटचा बाण बाहेर काढला जातो. तसंच आता सांगितलं जातंय की, लॉकडाउन लागू केलं नसतं तर स्थिती यापेक्षाही वाईट झाली असती. हा तर्क भ्रामक आहे. ‘इंडियन सायंटिस्ट रिस्पॉन्स टू कोविड-१९’च्या म्हणण्यानुसार लॉकडाउनच्या सगळ्या टप्प्यांमध्ये केवळ ८ ते ३२ हजार मृत्यु टाळले गेले आहेत. इथे हे लक्षात ठेवलं पाहिजे की, लॉकडाउन यमराजापासून वाचवत नाही.......