करोना व्हायरस : पुढील दोन महिन्यांत संपूर्ण जगाचीच मोठी परीक्षा आहे!
एका शहरात सुरू होऊन फक्त पाच महिन्यात हा आजार संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. एकापासून दुसऱ्याला अगदी सहज लागण करण्याची क्षमता असलेला विषाणू, लागण झाल्यापासून आजाराची लक्षणे दिसण्यासाठी लागू शकणारा दोन आठवड्यांचा कालावधी, मधल्या काळात संसर्ग होऊनही आजाराची लक्षणे न दिसणारे पण इतरांना लागण करू शकणारे बाधित लोक आणि जगभर विषाणू पसरवणारे आजचे जग या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे.......