'रोग वन : अ स्टार वॉर्स स्टोरी' : सर्जनशील कमी आणि गल्लाभरू जास्त
आताच्या काळात बनणारे 'स्टार वॉर्स'चे प्रयोग हे सर्जनशील कमी आणि गल्लाभरू जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यात नवीन कल्पनांना, चांगल्या अभिनयाला, विलक्षण लेखनाला, दिग्दर्शनाला आणि तांत्रिक यशाला एका मुख्य ग्राहक-प्रधान ध्येयापुढे फारसा वाव मिळत नाही, आणि ते ग्राहक-प्रधान ध्येय म्हणजे - चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी लोकांच्या जुन्या आठवणी जोजवून (वापरून) त्यांना तो चित्रपट बघायला भाग पाडणं! .......