स्त्रियांच्या वेदनांना मुखर करण्याचा प्रयत्न
स्त्रीवादी लेखनाच्या मर्यादा सांगताना अशी टीका केली जाते की, स्त्रिया त्यांच्या ‘चूल-मूल’च्या बाहेर येऊन लेखन करत नाहीत. पण हे शंभर टक्के खरं वाटत नाही. कारण चौकटीच्या आतलं तिचं जगणं, तिचे अनुभव इतके व्यापक आणि भयानक आहेत की, तेही समग्रपणे काही अपवाद वगळता साहित्यात आले नाहीत. हे सगळे अनुभव, प्रश्न लेखनातून यावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत........