“वायनाडमध्ये होत असलेल्या भूस्खलनांमागील प्राथमिक कारण मुसळधार पाऊस नाहीय. त्या भागात अनेक प्रकारचे (मानवी) हस्तक्षेप केले जात आहेत…” : माधव गाडगीळ यांची मुलाखत
जी काही तथ्ये समोर ठेवली जातात किंवा जी काही माहिती दिली जाते, ती पूर्णपणे खोटी असते. उदाहरणार्थ, एक गाव आहे कोट्टीकल. सरकार म्हणते की, या गावाच्या परिसरात तीन दगडांच्या खाणी आहेत, पण गुगल मॅप तर या भागात ३० खाणी दाखवत होता. त्यामुळे या भागात भूस्खलन होण्याचा धोका वाढला आहे. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा अशा गोष्टी घडण्याचं प्रमाण वाढतं.......