वैज्ञानिक तंत्रावर आधारित पुरावे नाकारणारी तथाकथित देशभक्ती विकृत तर आहेच; त्याबरोबरच कोविड साथीत दगावलेल्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अनादर करणारीही आहे
या सर्व संशोधनांत मांडलेले वाढीव मृत्यूंचे अनुमान अतिरंजित किंवा अवास्तव जास्त आहेत, असा दावा भारत सरकार करते; प्रत्यक्षात मात्र हे अनुमानही कमी असू शकते हे मात्र सरकार लक्षात घेत नाही. फक्त प्रत्यक्ष मृत्यू पाच लाखांहून काही पट जास्त आहेत, या गैरसोयीच्या ठरणाऱ्या निष्कर्षावरच भारत सरकारने आक्षेप घेतले आहेत.......