आपण जे सांगतो, त्याच्याकडे मुलांचं लक्ष नसतं; आपण जसं वागतो, त्याच्याकडेच मुलांचं लक्ष असतं!
काऊन्सेलर असणं त्या मानानं सोपं आहे, पण एक पालक असणं अवघड आहे. ती एक तारेवरची कसरत आहे. पण तितकीच त्यात मजाही आहे. पालक होणं हे ‘ट्रायल अँड एरर’च असणार आहे. आपल्या हातून चुका होणारच आहेत. कारण आपण काही १०० टक्के ‘पर्फेक्ट’ नाही, किंवा आपल्या दृष्टीनं आपण जे चांगलं वागतोय, ते मुलांना आवडेलच असं नाही. पण निदान आपल्या बाजूनं प्रयत्न तरी करायला हरकत नाही. पालक असणं खूप आनंदाचं आहे.......