औडकचौडक ताराबाई (‘औडकचौडक’ म्हणजे काय? तर- आडवंतिडवं वाकडंतिकडं कसंही. शिस्तबद्ध किंवा आखून-रेखून असं काही न केलेलं.)
ताराबाईंमुळे मराठी लोकसाहित्यातल्या-लोकसंस्कृतीतल्या अनेक अनवट अशा वाटा मराठी वाचकांना उमजल्या आहेत, आकळल्या आहेत. त्यांच्याप्रमाणे लोकसाहित्याच्या क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्रात इतरही अनेक मान्यवर होते आणि त्यातले काही आजही आहेत. परंतु ताराबाईंचं वेगळेपण हे की, त्यांनी परंपरेनं चालत आलेल्या लोकसंस्कृतीला, मातृसंस्कृतीशी जोडून घेतलं.......