आत्ताच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपला ‘अॅटिट्यूड’ कसा हवा? तर ‘आशावादी बुद्धिमान’ लोकांकडून ‘वास्तववादी इच्छाशक्ती’ला बळ पुरवणारा!
या सगळ्या गुंतागुंतीच्या, अस्ताव्यस्त, उफराट्या, काळाच्या उलट्या दिशेनं चाललेल्या काळात असंतुष्ट लोकांनी कोणता अॅटिट्यूड बाळगावा? आपली आशा चार पंचमांश लोप पावली आहे आणि तिचं फुटक्या मडक्यातून गळणाऱ्या पाण्याप्रमाणे गळणं चालू आहे, हे जाहीर करावं? का आशेचं पात्र चार पंचमांश भरलेलं आहे आणि ते भराभर भरतच चाललं आहे, असं जाहीर करावं? का अजूनच काही?.......