‘सत्तेचे राजकारण’ नको असल्यास पक्षोपपक्षांचे राजकारण नाहीसे करणे, ही प्राथमिक गरज आहे!
यथार्थ लोकशाही ही प्रत्यक्ष लोकशाहीच असली पाहिजे; राज्यकर्त्यांचे लोकांकरवी नियंत्रण झाले पाहिजे. हे शक्य आहे काय, हा आजच्या राजकारणातील खरा वैचारिक प्रश्न आहे. तो सोडवल्यानेच राजकीय व्यवहार पक्षोपपक्षांनी लोकशाहीच्या नावाने चालवलेल्या सत्तेच्या कलहापासून मुक्त होऊन उच्च पातळीवर जाऊ शकेल. ‘लोकांचे’ आणि ‘लोकांनी चालवलेले’ राज्य नसेल, तर ते लोकशाही या संज्ञेस पात्र नव्हे.......