रवींद्र केळेकर यांच्यानंतर दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे कोकणी भाषा इतर भारतीय भाषांप्रमाणेच सशक्त आणि समृद्ध आहे, हे वास्तव अधोरेखित झाले आहे!
जडणघडणीच्या काळात त्यांनी काही महत्त्वाचे मराठी कथाकार वाचले. पुढे त्यांनी काफ्फा, काम्यु, हेमिंग्वे यांचे साहित्य वाचले. ‘गांथन’ या संग्रहातील कथांवर थोडाफार हेमिंग्वेचा प्रभाव दिसून येतो. साधी, सोपी, ओघवती भाषा हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य त्यांनी सतत जपलेले आहे. कथेच्या तंत्रावर त्यांची जबरदस्त हुकुमत. मावजोनी कथेबरोबर कादंबऱ्याही लिहिल्या.......