फक्त राजकारणी लोकांना ‘खलनायक’ ठरवण्याची जी प्रथा आहे, त्याऐवजी जे अशा घटनांना ‘प्रत्यक्ष जबाबदार’ आहेत, त्यांच्याकडेही लक्ष जाणे गरजेचे आहे
सरकारला ‘राजकीय अजेंडा’ रेटायचा असतो. त्याला नियमांची चौकट घालून देण्याचे महत्त्वाचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांना करायचे असते. मात्र, अलीकडच्या काळात कारणे काहीही असतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडलेले दिसत नाही. सामान्य जनतेलाही प्रशासकीय नाकर्तेपणाची जाण असत नाही. त्यातूनच पुढे महाराष्ट्रभूषण पुरस्कारादरम्यान उष्माघाताने १४ जणांचा बळी जाण्याची दुर्घटना घडते.......