(परवा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेल्या) सुधा भारद्वाज आहेत तरी कोण?
कुठल्याही मोबदल्याशिवाब गोरगरिबांची वकिली त्या करतात. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची ऑफरसुद्धा नाकारली. ३५-४० वर्षांपासून सतत काम करून त्यांचे गुडघे त्रासून गेले आहेत. त्यांचे डॉक्टर मित्र त्यांना आराम करण्याचा सल्ला देतात. पण गरीब, शेतकरी आणि मजूर यांची एक छोटीशी आरोळी ऐकू येताच, त्यांच्या पायाला चाकं बांधली जातात… आणि मग त्या आपल्या शरीराचंही ऐकत नाहीत.......