‘कुटुंबाच्या भावना’ दुखावतात या एका समाजशास्त्रीय सत्याचा शोध!
सरिता आवाडांच्या आत्मकथनावरील आणि विद्युत भागवतांच्या लेखावरील प्रतिक्रियांमधून ध्वनित होणारा ‘कुटुंबाच्या भावना दुखावल्या’चा सूर हा एकप्रकारे चिकित्सेची, प्रश्न उपस्थित करण्याची दारे बंद करणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कौटुंबिकतेला प्रश्नांकित करण्यासाठीचे चिकित्सक चर्चाविश्व आपण म्हणावे तसे विकसित करू शकलेलो नाही. मात्र हे चिकित्सक चर्चाविश्व विस्तारता येऊ शकते.......