पर्यावरण विकासनीतीबाबत आपण सगळे आशा करू या की, ‘मोदी है तो मुमकिन है!’
पर्यावरणाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याची देश आणि समाज म्हणून खूप मोठी किंमत आज आपण मोजत आहोत. दूषित हवेमुळे भारतात दरवर्षी १२-१४ लाख अकाली मृत्यू होतात. भारतातील ८५ टक्के नद्या प्रदूषित आहेत. खते आणि कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे हजारो हेक्टर जमीन क्षारपड झाली आहे. फक्त वायुप्रदूषणाची समाजाला मोजावी लागणारी किंमत ही आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ८-१० टक्के इतकी प्रचंड आहे!.......