भारताच्या आर्थिक अस्वस्थतेची मुळे कशात आहेत?
भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने खाजगी क्षेत्रावर आधारलेली आहे. ती कोण्या नियंत्रणाने एका विशिष्ट दिशेला जाणार नाही, तसेच माध्यमातील रंगीबेरंगी शीर्षकातून परिस्थिती लपवून ठेवता येणार नाही. आणि कोणत्याही क्लुप्त्या काढून अर्थव्यवस्थेची अवस्था झाकता येणार नाही. मी पंतप्रधानांना सूचित करतो की, त्यांनी शंकेची जळमटे बाजूला सारून उद्योजकांना बरोबर घेऊन अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करावेत.......